स्मिथ, मार्क्स आणि गांधी
अर्थशास्त्राचा जनक अॅडम स्मिथ याला नुसते अर्थशास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा अर्थतत्त्वज्ञ म्हणणे जास्त उचित ठरेल. राजसत्ता आणि अर्थकारण यांचा अन्योन्यसंबंध तपासण्याची त्याला अठराव्या शतकातच गरज भासली. त्याच्या दूरदर्शीपणाचा हा पुरावा आहे. अँडम स्मिथ ग्रेट ब्रिटनचा नागरिक होता आणि ‘औद्योगिक क्रांती’चे जन्मस्थान इंग्लंड मानले जाते. याच इंग्लंडात पुढे कार्ल मार्क्स हाही अर्थतत्त्वज्ञ येऊन राहिला होता आणि भांडवलाची चिकित्सा …